esakal | मुलानेच मित्राच्या मदतीने केली चोरी, आईने दिली फिर्याद
sakal

बोलून बातमी शोधा

The boy committed the theft with the help of a friend

कपाटातील सोन्याचे दागिने, दुचाकी, मोबाईल, पॉवर बॅंक, घड्याळे व अन्य साहित्य, असा सुमारे 3 लाख 12 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला.

मुलानेच मित्राच्या मदतीने केली चोरी, आईने दिली फिर्याद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

संगमनेर ः मित्राच्या मदतीने स्वत:च्याच घरातून तीन लाखांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार शहरातील मालदाड रस्त्यावरील एमएसईबी कॉलनीत घडला. याबाबत शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत मंगल संजय डमरे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तीत म्हटले आहे, की मुलगा आतिश व मंगल यांच्यात नेहमी वाद होत. मंगल डमरे मंगळवारी (ता. 20) बाहेर गेल्याचे पाहून आतिश, त्याचा मित्र सूरज वाघ व त्याची पत्नी निकिता यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला.

कपाटातील सोन्याचे दागिने, दुचाकी, मोबाईल, पॉवर बॅंक, घड्याळे व अन्य साहित्य, असा सुमारे 3 लाख 12 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला. आरोपींनी सोन्याचे दागिने नाशिक येथील एका सराफास विकले, असे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आतिशसह त्याचा मित्र व मित्राची पत्नी यांच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक राणा परदेशी तपास करीत आहेत. 

loading image
go to top