कोपरगावच्या मुलाने जिंकले साडेबारा लाख

‘कोण होणार करोडपती’च्या हॉट सीटवर बसून गावाचे नाव उंचावले
Boy from Kopargaon won twelve and half lakhs in Kon Honar Karodapati show
Boy from Kopargaon won twelve and half lakhs in Kon Honar Karodapati show

कोपरगाव - तालुक्यातील सुरेगावसारख्या छोट्या गावातील रहिवासी व स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या संकेत संजय कदम यांनी ‘कोण होणार करोडपती’ या सोनी टीव्हीवरील खेळात मराठी अभिनेते सचिन खेडकर यांच्यासमोर हॉट सीटवर बसून प्रश्नांची उत्तरे देत तब्बल साडेबारा लाख रुपये जिंकून अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्या या यशामुळे तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष (कै.) सुंदरराव कदम यांचे संकेत हे नातू आहेत.

वडील संजय शेतकरी, आई जयश्री गृहिणी असलेल्या संकेतचे येथील संजीवनी महाविद्यालयात बी. फार्मसीपर्यंत शिक्षण झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एमबीए केले. सध्या ते केंद्र शासनाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. त्यांची सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार करोडपती’साठी निवड झाली. स्पर्धेत मी केवळ अडीच सेकंदांत फास्टर फिंगरमध्ये सर्वप्रथम आलो. शेवटी खेडेकर यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तराची खात्री नसल्याने व साडेबारा लाखांवरून पुन्हा तीन लाख वीस हजारपर्यंत येणार असल्याने, बाहेर पडण्याचे ठरवले. बक्षिसाची रक्कम आगामी काळात माझ्या शिक्षणावर खर्च करण्याचे ठरविले आहे, असे संकेत यांने जिंकल्यानंतर सांगितले. दरम्यान, या विजयामुळे कोपरगावकरांनी संकेतचे अभिनंदन केले आहे. दिवसभर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता.

आईच्या आग्रहास्तव मिस कॉल...

आई जयश्री टीव्हीवर ही मालिका बघत होती. तिनेच, ‘संकेत तू तयारी करतोस आहेस, तर एक मिस कॉल देऊन बघ,’ असे सांगितले. सुरवातीस मी नाही म्हणालो. मात्र, एक दिवस आईने मोबाईल डायल करून आणला व ‘तू केवळ हिरवे बटन दाब’ म्हणाली. अखेर आईच्या आग्रहास्तव मी मिस कॉल दिला आणि स्पर्धेसाठी निवड झाली. त्यामुळे, या सर्व यशामागे केवळ आईचा हात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com