
सोनई : शनैश्वर देवस्थान ट्रस्टने शनिमूर्तीला ब्रॅन्डेड तेल अर्पण करावे, असा फतवा काढला असला, तरी काल शनिवारपासून निर्णयाची अंमलबजावणी झाली खरी. मात्र एक नव्हे दोन नव्हे, तर तब्बल पाच तेल कंपन्यांचे तेल विक्रीसाठी गावात रात्रीतून अवतरले आहे. बाटलीवर असलेले स्टिकर नियमाला धरुन असले, तरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्व संशयास्पद तेलाचे नमुने उद्या सोमवारी रोजी अन्न व औषध विभागाकडे देण्यात येणार असल्याने तपासणी अहवाल चर्चेचा विषय ठरला आहे.