esakal | संगमनेरमध्ये नवरात्रातील माळेच्या मिरवणुकीची परंपरा खंडित
sakal

बोलून बातमी शोधा

Breaking the tradition of Navratri procession in Sangamner

शहरातील सप्तशृंगी मातेचे पुरातन मंदिर व रेणूका मातेच्या मंदिरात नवरात्रात भाविक गर्दी करतात. रंगार गल्लीतील सोमेश्वर मंदिरापासून निघणाऱ्या माळेची मोठ्या उत्साहात मिरवणूक निघत असते.

संगमनेरमध्ये नवरात्रातील माळेच्या मिरवणुकीची परंपरा खंडित

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर ः नवरात्रात देवीला अर्पण करायची माळ मोठ्या उत्साहात, मिरवणुकीने वाजतगाजत नेण्याची आगळीवेगळी परंपरा आहे. मात्र, यंदा कोविडमुळे वाद्यांशिवाय केवळ चौघांच्या उपस्थितीत ही परंपरा पाळणार असल्याचे आप्पासाहेब खरे यांनी सांगितले. 

शहरातील सप्तशृंगी मातेचे पुरातन मंदिर व रेणूका मातेच्या मंदिरात नवरात्रात भाविक गर्दी करतात. रंगार गल्लीतील सोमेश्वर मंदिरापासून निघणाऱ्या माळेची मोठ्या उत्साहात मिरवणूक निघत असते.

भाविकांनी वाहिलेल्या माळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने, बांबू उचलण्यासाठी नामंकित पहिलवान गोविंद लोणारी आणि त्यांच्या तालमीतले साथीदार हौसेने सरसावले. मिरवणूक मार्गावरील रहिवासी सडा-रांगोळ्यांनी तिचे स्वागत करतात. घटस्थापनेपासून नऊ दिवस रोज सायंकाळी सहा वाजता निघणाऱ्या मिरवणुकीत अनेक ढोलताशा पथके सहभागी होतात.

साधारण चार पिढ्यांपासून रावळ कुटुंबातील गणपतराव, बाबूराव, चंद्रशेखर व श्रीप्रसाद व रावळ बंधू आखाड्यातर्फे लाठीकाठी, बोथाटी, अग्निचक्र, दांडपट्टा आदींची प्रात्यक्षिके देवीची सेवा म्हणून सादर केली जातात. मात्र, कोविडमुळे यंदा या सर्व कार्यक्रमांना संगमनेरकर मुकले आहेत.