esakal | बैलगाडीतून घरी आणले नवरीला, इंधन दरवाढीचा अनोखा निषेध

बोलून बातमी शोधा

The bride was brought home in a bullock cart}

आता योगायोग असा की जेथे नवदांपत्याने ही बैलगाडी सफर केली. त्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे वर्चस्व आहे.

ahmednagar
बैलगाडीतून घरी आणले नवरीला, इंधन दरवाढीचा अनोखा निषेध
sakal_logo
By
सतीश वैजापूरकर

शिर्डी ः काल विवाहबध्द झालेल्या एका नवदांपत्याने लग्नमंडपासून आपल्या घरापर्यंतचा प्रवास सजविलेल्या बैलगाडीतून केला. इंधनदरवाढीचा निषेध करण्यासाठी त्याने ही बैलगाडी सफर केली. शिर्डी विधानसभा मतदार संघातील कोल्हेवाडी येथे अधिराज काकड व ज्ञानेश्वरी वामन हे दोघे काल विवाहबध्द झाले. तेथून पाच किलोमिटर अंतरावर जोर्वे हे अधिराजचे गाव. तेथपर्यतचा प्रवास या दोघांनी बैलगाडीतून केला.

आता योगायोग असा की जेथे नवदांपत्याने ही बैलगाडी सफर केली. त्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे वर्चस्व आहे. आणि जेथील नवरदेवाने मोदी सरकारचा इंधनदरवाढी बाबत निषेध केला ते जोर्वे गाव हे 
काँग्रेसपक्षाचे ज्येष्ठ नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे गाव आहे. हे दोन्ही नेते एकमेकांचे परंपरागत प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे नवदांपत्याची ही बैलगाडी सफर चर्चेचा विषय ठरली नाही तरच नवल.

जेथे दोन तुल्यबळ नेत्यात संघर्ष असतो तेथील राजकारणात कार्यकर्ते आणि पदाधिका-यांना मोठा सन्मान असतो. तेथील कार्यकर्त्यांच्या राजकीय जाणिवादेखील अधिक तीव्र असतात. वधू आणि वराकडील दोन्ही मंडळी थोरात समर्थक त्यामुळे त्यांनी विवाहसोहळ्याचे औचित्य साधून इंधन दरवाढीवर बरोबर हा असा अचूक निशाणा साधला. 

शिर्डी विधानसभा मतदारसंघात संगमनेर तालुक्यातील सव्वीस गावे समाविष्ट झाली आहेत. तेथे विखे आणि थोरात या दोन्ही नेत्यांत ग्रामपंचायतीपासून ते विधानसभा निवडणुकीपर्यंत कधी जोरदार संघर्ष होतो तर कधी तहाची बोलणी होतात. संघर्ष असल्याने कार्यकर्ते आणि पदाधिका-यांना दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून विशेष सन्मान मिळतो. विकासकामांची स्पर्धा सुरू असते. याउलट प्रतिस्पर्धी नाही अशा भागात स्पर्धा नसते. कार्यकर्त्यांना तुलनेत एवढे महत्वहीदेखील नसते.

हो आम्ही थोरातसमर्थक

जोर्वे येथील अधिराज काकडे आज सकाळशी बोलताना म्हणाले, मोदी सरकारच्या निषेध करण्यासाठी काल विवाह विधी झाल्यानंतर मी नववधुला बैलगाडीने घरी घेऊन आलो. 
तू महसुल मंत्री थोरात यांचा समर्थक आहेस का, असे विचारले असता तो म्हणाला, होय आम्ही दोन्ही बाजूंची मंडळी त्यांचे समर्थक आहोत. त्यांच्या हाकेला ओ द्यायला आम्ही सदैव तयार असतो.