esakal | बोदगेवाडी रस्त्यावरील पुलाला पावसाच्या पाण्याने पडले भगदाड
sakal

बोलून बातमी शोधा

The bridge on Bodgewadi road collapsed due to rain water

निघोज येथील बोदगेवाडी रस्त्यावरील खार ओढ्याजवळ जोरदार पावसाने आलेल्या पुराने निघोज- बोदगेवाडी रस्त्यावरील पुलाला पुराने भगदाड पडले आहे.

बोदगेवाडी रस्त्यावरील पुलाला पावसाच्या पाण्याने पडले भगदाड

sakal_logo
By
अनिल चौधरी

निघोज (अहदमनगर) : निघोज येथील बोदगेवाडी रस्त्यावरील खार ओढ्याजवळ जोरदार पावसाने आलेल्या पुराने निघोज- बोदगेवाडी रस्त्यावरील पुलाला पुराने भगदाड पडले आहे. या रस्त्यावर वाहतुक मोठी असल्याने सध्या हा पुल मृत्युचा सापळा बनला असुन प्रशासनाने या पुलाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

गेल्या 15 वर्षापूर्वी या पुलाचे काम झाले होते. नुकतेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तीन किलोमीटरचे मुरुमीकरण झाले आहे. आमदार निलेश लंके यांनी तीन किलोमीटर रस्त्याचे लवकरच डांबरीकरण करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र निघोज जवळील सुपाता डोंगर पट्यात तीन मोठे पाऊस झाल्यामुळे खारओढ्याला मोठे तीन पुर आले. त्यामुळे पुलावरुन प्रचंड पाणी वाहुन गेले. यामुळे खार ओढ्यावरील पुराचा भराव वाहुन मोठे भगदाड पडले आहे. याचा फटका शेतकऱ्यांना आपले वाहने ये- जा करण्यासाठी बसला आहे.

रात्रीच्या वेळी या रस्त्यावरुन मोठी वाहतुक सुरु असल्याने. या पुलावर सध्या छोटे मोठे अपघातही घडत असल्याने हा पुल म्हणजे मृत्युचा सापळाच बनला असल्याने या पुलाची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी निघोज सोसायटीचे माजी चेअरमन अशोकराव ढवळे, कांदा व्यापारी भिमाजी घुले, युवानेते विजय ढवळे, प्रा.ज्ञानेश्वर कवाद, पत्रकार भास्कर कवाद, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त रमेश ढवळे,विश्वास शेटे, शांताराम ढवळे,प्रभाकर ढवळे ,दिलीप कवाद,दत्ताञय लंके ,सतिष घुले ,मोहन कवाद,प्रभाकर घुले,नवनाथ ईरोळे, कैलास कवाद,रवी लंके,योगेश लंके,किसन लंके ,संतोष घुले ,सुनिल घुले,शांताराम कवाद,रामदास कवाद,अनिल लंके ,डाॕ.गुलाब पठारे ,महादेव कवाद ,श्रीकांत कवाद,योगेश कवाद,सागर पवार यांनी केली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर