
राहाता : कोपरगाव तालुक्यातील वाणी वस्ती येथे साठवण तलावात बहीण-भावाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज (ता. २१) दुपारी ही घटना घडली. साहिल प्रशांत डोशी (वय १२), दिव्या प्रशांत डोशी (वय १५) अशी मृत्युमुखी पडलेल्या बहीण-भावाची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, वाणी वस्ती येथे प्रशांत कन्हैयालाल डोशी हे पत्नी, एक मुलगा, दोन मुलींसह राहतात.