सख्खा भाऊ निघाला पक्का वैरी, जमिनीसाठी चाकूने भोकसले

सुनील गर्जे
Sunday, 20 December 2020

अधिक माहिती अशी, भानसहिवरे येथील लतीफ देशमुख यांचे कय्यूम, नय्यूम, रफिक, मोईन व नदीम अशी पाच विवाहित मुलांपैकी कय्यूम हे गावात तर इतर चौघे नगर येथे राहतात.

नेवासे : सख्या भावांमध्ये जमिनीच्या वाटणी वरून झालेल्या वादात एकाचा चाकू भोकसून खून केला. ही घटना रविवारी दुपारी भानसहिवरे येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले.

या घटनेला वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. नय्यूम लतीफ देशमुख (वय 50) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

अधिक माहिती अशी, भानसहिवरे येथील लतीफ देशमुख यांचे कय्यूम, नय्यूम, रफिक, मोईन व नदीम अशी पाच विवाहित मुलांपैकी कय्यूम हे गावात तर इतर चौघे नगर येथे राहतात.

देशमुख यांची भानसहिवरे येथील ऐतिहासिक गढी परिसरात इनामाचे अडीच एकर शेत जमीन आहे. त्या जमिनीच्या वाटणीसंदर्भात आज शेतात आठ जणांची बैठक झाली. त्यात वादावादी होऊन एकाने नय्यूमवर चाकूने हल्ला केला. त्यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान, त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयित पोलिसांनी ताब्यात घेतले. शेवगावचे पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे म्हणाले, की पाच भावांमध्ये जमिनीच्या वाटण्यावरून वाद होता. त्या वादातून एकाचा खून झाला. पोलिस पुढील तपास करीत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The brother stabbed him for the land

Tags
टॉपिकस
Topic Tags: