नगर - नगर शहराची स्थापना 28 मे 1490 ला झाली. या शहरातील भुईकोट किल्ल्यात निजामशहा, मोगल, मराठे व इंग्रज यांची सत्ता राहिली. त्यामुळे हे शहर नेहमीच एक मोठी बाजारपेठ राहिली. त्यामुळे या शहरातील बाजारपेठे व्यापाऱ्यांचे व धनिकांचे वाडे आजही पहायला मिळतात. यातील बरीच घरे आता धोकादायक झाली आहेत. शहरातील 12 इमारती अतिधोकादायक असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे. या इमारतींच्या मालकांना नोटिसाही देण्यात आलेल्या आहेत. या इमारती संबंधित इमारत मालकांनी न पाडल्यास महापालिका प्रशासन या इमारती उतरवून घेईल असे कळविण्यात आले आहे. 113 इमारती धोकादायक असल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे. त्यांनाही नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. शहरातील अशाच एका धोकादायक इमारतीमुळे सुस्थितीत असलेली इमारत आज पहाटे पडली.
शहरातील गंजबाजारात तीनगल्लीत एका धोकादायक इमारत होती. या इमारतीच्या मालकाला महापालिका प्रशासनाने इमारती संदर्भात नोटीस दिली होती. त्यानुसार इमारत मालकाने धोकादायक इमारत पाडली. शहरातील बाजारपेठेतील इमारती या परस्परांचा आधार घेत उभ्या आहेत. या इमारतीच्या शेजारील इमारतीचा एकबाजूचा आधार त्यामुळे गेला. पाडलेली धोकादायक इमारतीचे बांधकाम करताना नवीन पद्धतीने बांधकाम करण्यास सुरवात करण्यात आली. यात जवळच्या इमारतीच्या आधाराचा विचार झाला नाही. यातच रात्री शहरात संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे आज पहाटे या धोकादायक इमारती शेजारील सुस्थितीत असलेली तीन मजली इमारत अचानक पडली. या इमारतीच्या तळाला व वरील दोन मजल्यावर लोक निवास करत होते. वरील मजल्यावर रात्रीच्या वेळी कोणीही नव्हते. सुदैवाने या इमारतीत राहणारे कोणी इमारतीच्या पडलेल्या भागात नव्हते. त्यामुळे जीवित हानी टळली. तीन महिन्यांपूर्वी मुख्यबाजारपेठेतीलच मोचीगल्लीत असलेल्या एका दुकानाची इमारतही याच कारणाने पडली होती.
हा परिसर बाजारपेठेचा असल्याने वाहतुकीला अडथळा ठरण्याची शक्यता होती. घटनेची माहिती महापालिका प्रशासनाला मिळताच शहर अभियंता सुरेश इथापे पहाटे पाच वाजता घटना स्थळी दाखल झाले. त्यांच्या बरोबर अतिक्रमण विभाग व अग्निशम विभागाचे सुमारे 25 कर्मचारी होते. आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख शंकर मिसाळ घटना स्थळी आले. त्यांनी तात्काळ महावितरण कर्मचाऱ्यांनाही घटनास्थळी बोलावून घेतले. महावितरणाच्या इलेक्ट्रिक विभागाच्या हायड्रोलिक वाहनाच्या सहाय्याने महापालिका कर्मचाऱ्यांनी पडलेल्या इमारतीचा धोकादायक भाग पाडून टाकला. इमारत पडल्यामुळे त्या इमारतीतील नागरिकांचे संसार मात्र उघड्यावर आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.