
अहिल्यानगर : वडारवाडी येथील मेडिकल दुकान फोडणाऱ्या तिघांना भिंगार कॅम्प पोलिसांनी संगमनेर येथील बसस्थानक परिसरात शिताफीने पकडले. त्यांनी भिंगार परिसरात ५ ठिकाणी घरफोड्या केल्याचे उघडकीस आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व किराणा माल, असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.