निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या घरात साडेपाच लाखांची चोरी

A burglary took place at the house of a retired police officer in Hingangaon on Tuesday afternoon
A burglary took place at the house of a retired police officer in Hingangaon on Tuesday afternoon
Updated on

अहमदनगर : तालुक्‍यातील हिंगणगाव येथील सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या घरातून मंगळवारी दुपारी चोरांनी, दाम्पत्यावर चाकूहल्ला करीत सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम, असा पाच लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला. चाकूहल्ल्यात दाम्पत्य जखमी झाले.

मंत्री गडाखांचे नेतृत्वाखाली प्रलंबित प्रश्न मार्गी लावू
 
याबाबत सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक भाऊसाहेब दगडू ढगे (रा. हिंगणगाव, ता. नगर) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ढगे यांच्या घरात मंगळवारी दुपारी तीन वाजता दोनजण घुसले. दाम्पत्यावर चाकूहल्ला करीत दागिने व रोख रक्कम, असा पाच लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे, सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासपथकाला सूचना केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com