
राज्यपालांच्या पुतळ्याचे दहन
कर्जत : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी सकल मराठा समाजाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पुतळ्याचे दहन केले. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबईत छत्रपती संभाजीराजे यांनी आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केले. त्यास पाठिंबा म्हणून येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाने उपोषण सुरू केले.
मात्र, छत्रपती संभाजीराजे यांच्या सर्व मागण्या शासनाने मंजूर केल्यानंतर आंदोलन विसर्जित करण्यात आले. नंतर सकल मराठा समाजाने घोषणाबाजी करीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामदास स्वामी यांचा हवाला देत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरले. त्याचा निषेध म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे.
- धनंजय लाढाणे, प्रमुख समन्वयक, सकल मराठा समाज, कर्जत