
केडगाव : सायंकाळची वेळ...रस्त्याच्या उतारावर बस मागील चाकांचा तुटलेल्या हाऊजिंग एक्सल... बसने घेतलेले हेलकावे, प्रवाशांचा टांगणीला लागलेला जीव, चालकाने दाखविलेले चातुर्य, रस्त्यालगत डगरीकडे घेतलेले वाहन आणि सुदैवाने बसमधील सुमारे ४० प्रवाशांचा जीव वाचला. हा थरार अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील कामरगाव वालुंबा नदीवरील पुलाजवळ शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी घडला.