शेतकऱ्यांची एकजुट; अकोले तालुक्यात पाडले ‘हे’ काम बंद

शांताराम काळे
Wednesday, 22 July 2020

म्हाळादेवी येथे सुरु असलेले निळवंडे कालव्याचे खोदकाम म्हाळादेवी येथील शेतकऱ्यांनी बंद पाडले.

अकोले (अहमदनगर) : म्हाळादेवी येथे सुरु असलेले निळवंडे कालव्याचे खोदकाम म्हाळादेवी येथील शेतकऱ्यांनी बंद पाडले. कालव्यामध्ये फुटलेल्या जलवाहिनी प्रशासन व कॉन्ट्रॅक्टर यांनी जोडून द्याव्यात, कॅनॉलवरून क्रॉसिंग करणाऱ्या रस्त्यावर छोटे छोटे पूल बांधावेत तसेच पाच वर्षापासून एका ओढ्यावर एका पुलाचे बंद पडलेले काम सुरु करावे, अशी मागणी केली.

 
कॅनॉलमध्ये ज्याची घरे जाणार आहेत त्यांना घरकुल योजनेनुसार घरे द्यावीत. कॅनॉलग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावे (उदा. साई संस्थान शिर्डी, सहकारी बँक, साखर कारखाना, शिक्षण संस्था यासारख्या संस्थेमध्ये समाविष्ट करून घ्यावे.) आदी मागण्या शेतकरी व तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे, अशोकराव भांगरे, मिनानाथ पांडे व उपसरपंच प्रदीप हासे यांनी मांडल्या व ह्या मागण्या. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत कालव्याचे काम बंद राहतील, अशी घोषणा केली.

याप्रसंगी पंचक्रोशीतील शेतकरी व प्रमुख कार्यकर्ते राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, विनोद हांडे, विकास बंगाळ, भाऊसाहेब मेडगे, भाऊसाहेब आभाळे, सुभाष मालुंजकर, राजेंद्र कुमकर, रवींद्र मालुंजकर सुभाष हासे, गणेश हासे, सुरेश मुंडे, दशरथ हासे, बंडू हासे, रामदास हासे, बाळकृष्ण हासे, कृष्णा हासे, पवन हासे, कैलास मुंडे, एकनाथ हासे, भास्कर हासे, संजय हासे, विठ्ठल हासे, रोहिदास वैष्णव, दिलीप हासे, सतीष तिकांडे, भगवान करवर, बाळासाहेब घोडके, जनार्दन हासे, विलास हासे, विशाल (पप्पू) हासे, जितेंद्र मुंडे, अनिल मुंडे आदी शेतकरी उपस्थित होते.

संपादन : अशाक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The canal work started at Mhaladevi in ​​Akole taluka was stopped