
जामखेड: जामखेड तालुक्यातील जातेगाव येथील ''आफूची शेती'' फुलली होती. जामखेड पोलिसांनी संबंधिताच्या शेतावर छापा घातला असता तेही अवाक झाले. पोतेच्या पोते भरून अफूची भोंडे पोलिसांनी जप्त केली.
तालुक्यात गांजाची चोरुन शेती करणाऱ्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. त्यांचाही शोध पोलिसांकडून घेतला जाणार आहे. गांजा तस्करीवरही पोलिसांची करडी नजर आहे.
धडाकेबाज कार्यवाही करिता प्रसिद्ध असलेले जामखेडचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड जामखेडला रुजू झाल्यापासून निरनिराळ्या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यात त्यांना यशही मिळत आहे.
जातेगाव ता.जामखेड येथील वासुदेव महादेव काळे याच्या शेतात 56 किलो वजनाची हिरव्या रंगाची बोंडे व पाने असलेली 1 लाख 69 हजार 815 रुपये किंमतीची अफुची झाडे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात आढळून आली. पोलिसांनी अफूच्या झाडांसह काळे यास ताब्यात घेतले. अमली औषधे, द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियमानुसार कार्यवाही करून गजाआड केले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी ः जामखेड तालुक्यातील जातेगाव येथील काळे वस्तीवर एकाने अफूची झाडे शेतात लावली आसल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना गुप्त खबऱ्याची माध्यमातून मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी गुरुवारी ( ता. 25) रोजी सायंकाळी पोलिस पथकातील सहकारी पोलिस काँन्स्टेबल
संजय लाटे, संदीप आजबे, संग्राम जाधव, आबासाहेब अवारे, विजय कोळी, सचिन पिरगळ, संदिप राऊत, अविनाश ढेरे यांच्यासह त्या ठिकाणी गेले. त्यांनी खात्री करुन घेतली आणि आरोपी वासुदेव महादेव काळे (रा. काळे वस्ती, जातेगाव ) याच्या गट नंबर 1077 मधिल शेतात 56 किलो वजनाची अफूची हिरव्या रंगाची बोंडे व पाने असलेली 1 लाख 69 हजार 815 रुपये किंमतीची झाडे त्यांना आढळून आली. छापा टाकून सर्व झाडे जप्त केली.
बेकायदा सावरकारीचे काय
अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी जामखेडचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड पोलिस पथकाच्या माध्यमातून निरनिराळे छुपे काळे धंदे मोडून काढीत आहेत. मात्र, इतर काळ्या धंद्याबरोबरच तालुक्यात सुरू असलेली बेकायदेशीर सावकारकी थांबविण्याचे मोठे आहे. अहमदनगर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.