esakal | सात कार वाहून नेणारा कंटेनर चोरणारी टोळी पकडली

बोलून बातमी शोधा

The car-carrying container was caught by the gang}

नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर हिवरगाव पावसा "टोल'नाका परिसरात कंटेनरसह आतील नवी सात वाहने, अशी सुमारे 90 लाख रुपयांची लूट करणाऱ्या टोळीतील एकास तालुका पोलिसांनी अवघ्या चार तासांत जेरबंद केले. 

सात कार वाहून नेणारा कंटेनर चोरणारी टोळी पकडली
sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर ः नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर हिवरगाव पावसा "टोल'नाका परिसरात कंटेनरसह आतील नवी सात वाहने, अशी सुमारे 90 लाख रुपयांची लूट करणाऱ्या टोळीतील एकास तालुका पोलिसांनी अवघ्या चार तासांत जेरबंद केले. त्याच्याकडून कंटेनर, नव्या वाहनांसह रोख रक्कम हस्तगत केली. अकलाख असीम ऊर्फ अकलाख असिफ शेख (मूळ रा. खलिलपुरा (कागदीपुरा), ता. जुन्नर, जि. पुणे, हल्ली रा. कुरण, ता. संगमनेर) असे आरोपीचे नाव आहे. 

दिल्ली येथून चालक हिदायत हनिफ खान (वय 29, रा. छरोरा, ता. ताऊर, जि. मेवात (हरियाना) हा कंटेनरमधून (एचआर 38 डब्ल्यू 8120) 60 लाख रुपये किमतीच्या नव्या सात मोटारी घेऊन गोव्याला जात होता. हिवरगाव पावसा "टोल'नाक्‍याच्या पुढे काल (शुक्रवारी) सायंकाळी चहा पिण्यासाठी तो टपरीवर थांबला होता. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या आरोपीने त्याच्या चार साथीदारांना बोलाविले.

चालक खानला कटरचा धाक दाखवून लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. त्याच्याकडील अडीच हजार रुपये, एटीएम कार्ड काढून घेतले. मध्यस्थी करणाऱ्या टपरीचालकालाही मारहाण केली. मारहाणीमुळे चालक घाबरून मक्‍याच्या शेतात लपला. 

दरम्यान, कंटेनर घेऊन आरोपी पसार झाले. चालकाने फोनद्वारे दरोड्याची माहिती दिल्यानंतर तालुका पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी हजर झाले. चालकासोबत पोलिसांनी परिसर पिंजून काढला. त्याच वेळी वरील आरोपी दुचाकीवर येताना दिसला. चालकाने ओळखल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. एके ठिकाणी उभा केलेला कंटेनर व दरोड्यातील रोख रक्कम, असा 90 लाख 2 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.