जनावरांचा टेम्पो अडवल्याने दोघांविरूद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 December 2020

पीकअप टॅम्पोसह आणखी एका विनाक्रमांकाच्या टॅम्पोमधुन जनांवरे घेवून काही शेतकरी बुधवारी (ता. 16) सांयकाळी सहाच्या सुमारास शहरातील शिवाजी चौकातून जात होते.

श्रीरामपूर ः लोणी (ता. राहाता) येथून वक्ती-पानवीसह (ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) अशोकनगर परिसरात जणांवरे घेवून जाणारे दोन टॅम्पो अडविले. ही घटना बुधवारी (ता. 16) सायंकाळी सहाच्या सुमारास येथील शिवाजी चौकात घडली.

या प्रकरणी पोलिस शिपाई पंकज गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कुणाल करंडे, किशन ताकटे, उज्वल डाकटे यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.

पीकअप टॅम्पोसह आणखी एका विनाक्रमांकाच्या टॅम्पोमधुन जनांवरे घेवून काही शेतकरी बुधवारी (ता. 16) सांयकाळी सहाच्या सुमारास शहरातील शिवाजी चौकातून जात होते. त्यावेळी टॅम्पोसमोर दुचाकी आडवी लाऊन टॅम्पोतील जनांवरे कत्तल करण्यासाठी घेवुन जात असल्याचा सवाल करीत टॅम्पो चालकाची वरील तिघांनी अडवणूक केली.

दरम्यान, जनांवरे घेऊन जाणारे टॅम्पोची अडवणूक करुन पोलिस ठाण्यासमोर उभी केली होती. सायंकाळी सहा ते मध्यरात्री एक वाजेपर्यंत जनावरे आणि शेतकऱ्यांची कोंडी झाल्याने काही जनावरे टॅम्पोतून खाली काढावे लागले. अखेर प्रभारी प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक नोपाणी मध्यरात्री एक वाजता ठाण्यात आल्यानंतर पोलिस कर्मचारी गोसावी यांच्यामार्फत फिर्याद देवून संबधीतांवर गुन्हा दाखल केला. तसेच संशयास्पद अडवणूक केल्याने पोलिसांनी संबधीतांना खाक्‍या दाखवून जनावरांची सुटका केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A case has been registered against them for obstructing the tempo of animals