लग्नाचे आमिष दाखवुन अल्पवयीन मुलीला पळविले 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 July 2020

लग्नाचे आमिष दाखवून पारनेर तालुक्‍यातील निघोज येथून एका अल्पवयीन मुलीला पळवुन नेल्याची घटना घडली आहे. मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

निघोज (अहमदनगर) : लग्नाचे आमिष दाखवून पारनेर तालुक्‍यातील निघोज येथून एका अल्पवयीन मुलीला पळवुन नेल्याची घटना घडली आहे. मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
शनिवारी 11 जुलैला रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास 16 वर्षाची मुलगी निघोज येथील घरात आई- वडील असताना घराला बाहेरुन कडी लावुन बेपत्त्ता झाली. तिच्या आई-वडीलांनी निघोज परिसर तसेच नातेवाईकांकडे तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतू ती सापडली नाही. त्यामुळे रविवारी दुपारी मुलीच्या वडीलांनी पारनेर पोलिस ठाण्यात जाऊन अल्पवयीन मुलीस फुस लाउन पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला. सोशल मीडियावरील ओळखीतुन या मुलिला फुस लावुन पळवुन नेले असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. काही दिवसांत अल्पवयीन मुलींच्या अपहरनाच्या घटना वाढल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या घटनेमुळे निघोज परिसरात खळबळ उडाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉस्टेंबल शेलार तपास करीत आहेत. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A case has been registered with the police in Nighoj in Parner taluka