esakal | चुलत चुलत्याकडून शिक्षिकेवर अत्याचार; राहुरी पोलिसात गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

A case has been registered with the Rahuri police on the complaint of the teacher

चुलत चुलत्याने पुतणीला बदनामीची व तिच्या आई- वडिलांना, बहिणीला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन, वारंवार बलात्कार केला. नात्याला काळीमा फासला. पीडित तीस वर्षांची महिला राहुरी परिसरातील एका शाळेत शिक्षिका आहे.

चुलत चुलत्याकडून शिक्षिकेवर अत्याचार; राहुरी पोलिसात गुन्हा दाखल

sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी (अहमदनगर) : चुलत चुलत्याने पुतणीला बदनामीची व तिच्या आई- वडिलांना, बहिणीला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन, वारंवार बलात्कार केला. नात्याला काळीमा फासला. पीडित तीस वर्षांची महिला राहुरी परिसरातील एका शाळेत शिक्षिका आहे.

तिच्याकडून शिक्षक बँकेचा सात लाख रुपयांचा धनादेश बळजबरीने घेतला. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून काल (मंगळवारी) रात्री राहुरी पोलिस ठाण्यात एक जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी पसार आहे.

संशयित आरोपी (वय ४०, रा. अहमदपूर, जि. लातूर) येथील आहे. पीडितेचा तो नात्याने चुलत चुलता आहे. पीडितेच्या फिर्यादीत म्हंटले की, त्यांचे कुटुंब मूळ अहमदपूर येथील आहे. आरोपी त्यांच्या घराजवळ राहणारा आहे.

२०११ मध्ये आरोपीने कुटुंबातील व्यक्तींना जीवे ठार मारण्याची व बदनामी करण्याची धमकी देऊन, पहिल्यांदा अहमदपूर येथे राहत्या घरी बलात्कार केला. त्यानंतर वेळोवेळी अत्याचार करीत राहिला. चार वर्षानंतर शिक्षिकेची नोकरी लागल्यावर, नोकरीच्या ठिकाणी येऊन अत्याचार करू लागला. पैठण येथे भाडोत्री घरात व शिर्डी येथे लॉजवर वेळोवेळी बळजबरीने इच्छेविरुद्ध बलात्कार केला. 

२०११ पासून सप्टेंबर २०१९ दरम्यान अत्याचार सुरू राहिला. राहुरीत अत्याचारानंतर शिक्षक बँकेचा सात लाख रुपयांचा धनादेश बळजबरीने घेतला." असेही फिर्यादीत म्हंटले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर