तिसऱ्या डोळ्याची वायर उंदराने कुरतडली; पाथर्डीतील सीसीटीव्ही बंद

राजेंद्र सावंत
Sunday, 22 November 2020

चार महिन्यापूर्वी शहरात पालिकेच्या नावीन्यपुर्ण योजनेतुन २१ लाख रुपये खर्चुन बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कँमेरे ११ आक्टोंबर 2020 पासुन बंद पडले आहेत.

पाथर्डी (अहमदनगर) : चार महिन्यापूर्वी शहरात पालिकेच्या नावीन्यपुर्ण योजनेतुन २१ लाख रुपये खर्चुन बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कँमेरे ११ आक्टोंबर 2020 पासुन बंद पडले आहेत. उंदराने वायर कुरताडल्याने तो विषय आमच्या वाँरटीमधे येत नाही, असे कँमेरे पुरविणाऱ्या कंपनीचे म्हणणे आहे. तर सीसीटीव्ही कँमेऱ्याचे काम सदोष असुन ठेकेदाराला बिल देवु नये, असे पालिकेतील नगरसेवकांचे म्हणणे आहे. 

पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी मेक्युअर झोन कंपनीला सीसीटीव्ही कँमेर बंद पडले आहेत. ते तातडीने दुरुस्त करण्यासाठी पत्र दिले आहे. शहरात होणारे अपघात, चोऱ्या व इतर गुन्हे उघडकीस येण्यासाठी कँमेऱ्यांची खुप मदत होते. कँमेरे बंद पडल्याने पोलिसही हतबल झाले आहेत. 

शहरात गेल्या चार महीन्यापुर्वी पालिकेने नावीन्यपुर्ण योजनेतुन सुमारे पंधरा ते वीस सीसीटीव्ही कँमेरे बसविले आहेत. पुणे येथील मे.मेक्युअर झोन कंपनीला कँमेरे बसविण्याचे काम दिले होते. तीन महीने कँमेरे चांगले चालले मात्र गेल्या अकरा आक्टोंबर 2020 पासुन सर्व कँमेरे बंद पडले आहेत. कँमे-यांचे नियंत्रण पोलिस ठाण्यातुन केले जाते. पोलिसांनी नगरपरीषदेला पत्र देवुन कँमेरे सुरु करण्याची विनंती केली.पालिकेच्या मुख्याधिका-यांनी कंपनीला कँमेरे बंद पडले असुन ते दुरुस्त करावेत असे पत्र 21 आक्टोंबर 2020 रोजी दिले आहे. 

नगरसेवक रमेश गोरे म्हणाले, पालिकेने शहरात बसविलेल्या सीसीटीव्ही कँमे-यांचे काम अदयाप पुर्ण झालेले नाही. जे काम झाले ते सदोष आहे. त्यामुळे संभधीत कपंनीला बिल अदा करु नये असे लेखी पत्र मी पालिकेला दिलेले आहे. दोन वर्षाची देखभाल दुरुस्ती ही कंपनीकडे आहे. आणखी काही भागात कँमेरे बसविण्याचे काम अपुर्ण आहे.

मे.मेक्युअर झोनचे (पर्वती, पुणे) रितेश खेरा म्हणाले, आम्ही नगरपालिकेला कँमेरे पुरविले आहेत. काम होवुन चार महीने झाले अद्याप एक रुपयाचे बिल कंपनीला मिळालेले नाही. कँमे-याची देखभाल आमच्याकडे आहे मात्र वायरींग उंदराने कुरतडली आहे. ती दुरुस्ती वाँरटीमधे येत नाही. हे काम पालिकेने करावे. एकवीस लाखापैंकी एक रुपया देखील काम होवुनही मिळालेला नाही.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CCTV cameras off in Pathardi