
अहिल्यानगर : वाळकी (ता. अहिल्यानगर) येथील शेतकरी सुनील सावळेराम बोठे यांना डाळिंब पीकविमा नुकसान भरपाईपोटी ८० हजार तसेच तक्रारीचा खर्च दहा हजार, अशी एकूण ९० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्ष प्रज्ञा देवेंद्र हेन्द्रे, सदस्य चारु विनोद डोंगरे व संध्या श्रीपती कसबे यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वाळकी शाखेला दिले आहेत. तक्रारदारातर्फे ॲड. सुरेश लगड यांनी काम पाहिले.