शिंगवे नाईक (ता. नगर) येथील गुरूमहाराज सभागृहात जागतिक मृदा दिनानिमित्त प्रात्यक्षिकासह रब्बी हरभराविषयी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम झाला.
नगर ः शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे बियाण्यांचा पुरवठा होणे गरजेचे आहे. केंद्र सरकारचे शेतमाल विनियमन विधेयक शेतकऱ्यांसाठी हानीकारक आहे. हे धोरण भांडवलदारांच्या फायद्याचे आहे, असे मत जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनी व्यक्त केले.
शिंगवे नाईक (ता. नगर) येथील गुरूमहाराज सभागृहात जागतिक मृदा दिनानिमित्त प्रात्यक्षिकासह रब्बी हरभराविषयी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम झाला.
त्यावेळी शेळके बोलत होते. पंचायत समिती सदस्य व्ही. डी. काळे, सखाराम सरक, बाळासाहेब गरुडे, विश्वास जाधव, विकास काळे, विवेक शिंदे, भरत काळे, निखील जाधव, पोपट नवले, सूर्यकांत शेकडे, डॉ. यशवंत गाडेकर आदी उपस्थित होते.