
अहिल्यानगर: पती सोबत दुचाकीवर चाललेल्या महिलेच्या गळ्यातील दागिने पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी हिसकाविण्याचा प्रयत्न केला. त्यात हिसका बसून महिला दुचाकीवरून रस्त्यावर पडल्याने तिच्या डोक्याला गंभीर इजा होवून तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अहिल्यानगर-पुणे महामार्गावर जातेगाव (ता. पारनेर) शिवारात मंगळवारी (ता. २०) दुपारी घडली. चैताली प्रदीप तागडकर (वय ३५, रा. वडारवाडी, भिंगार), असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.