
कोल्हार: चंद्रापूर (ता. राहाता) येथील कृषिभूषण ॲग्रो टुरिझमला महाराष्ट्र कृषी पर्यटन उद्योजकता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रवरा परिसरातील कृषिभूषण बन्सी तांबे व प्रा. डॉ. विशाल तांबे या पिता-पुत्रांनी ॲग्रो टुरिझम विकसित केले आहे. त्यांनी लेखक व अभिनेते मिलिंद शिंदे यांच्या हस्ते पुण्यात हा पुरस्कार स्वीकारला.