राहात्‍याचे बॉयलर आदिवासींना वरदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कार्बोनायझेशन तंत्रज्ञानाचा वापर करून येथील उद्योजक विजय कडू पाटील यांनी तयार केलेले बॉयलर.

राहात्‍याचे बॉयलर आदिवासींना वरदान

शिर्डी - कार्बोनायझेशन पद्धतीचा वापर करून तयार करण्यात आलेल्या बॉयलरच्या साहाय्याने जंगलातील वाळलेल्या लाकडांपासून अवघ्या सहा तासांत एक मेट्रिक टन कोळसा तयार करता येतो. आसाम, मेघालय, मणिपूर, हिमाचल प्रदेश या राज्यांतील जंगली भागातील आदिवासी बांधवांना हे बॉयलर वरदान ठरले आहेत. ते बचतगटांच्या माध्यमातून कोळसानिर्मिती करतात. त्यांच्या मागणीवरून, येथून जवळच असलेल्या सावळीविहीर येथील श्रीराम इंडस्ट्रीचे उद्योजक विजय कडू पाटील हे या पद्धतीचे बॉयलर तयार करीत आहेत.

याबाबत ‘सकाळ’शी बोलताना उद्योजक कडू पाटील म्हणाले, की पूर्वांचल प्रदेश घनदाट जंगलांसाठी प्रसिद्ध आहे. वाळलेली झाडे आणि फांद्यांपासून तेथील आदिवासी बांधव पूर्वापार कोळसानिर्मिती करतात. परंपरागत पद्धतीने कोळसा करणे जिकिरीचे आणि अधिक श्रमाचे असते. कार्बोनायझेशन तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या बॉयलरच्या साहाय्याने, वाळलेल्या जंगली फांद्या व निरुपयोगी लाकडापासून अवघ्या सहा तासांत एक मेट्रिक टन वजनाचा कोळसा तयार करता येतो. शिवाय, कमी श्रमात आणि कमी खर्चात हा कोळसा तयार होतो. त्याचा दर्जाही उत्तम असतो.

या बॉयलरच्या खालच्या बाजूस वाळलेल्या लाकडांच्या साहाय्याने उष्णता निर्माण करायची. तेथे असलेल्या दोन पोकळ पट्ट्यांना उष्णता लागते. त्यातील कार्बनडायऑॅक्साईड वायू प्रचंड तापतो. तो बॉयलरच्या वरच्या बाजूस असलेल्या पाण्यात सोडला जातो. पाणी तापते व आणखी उष्णता निर्माण होते. त्यातून तयार होणारी उष्ण वाफ बॉयलरमध्ये ठेवलेल्या वाळलेल्या लाकडांपासून अवघ्या सहा तासांत एक मेट्रिक टन कोळसा तयार करते. कमीत कमी इंधनात (वाळलेली लाकडे) कमीत वेळ आणि कमीत कमी खर्चात कोळसा तयार करणारे हे तंत्रज्ञान आहे. पूर्वांचलातील आदिवासी बांधवांच्या संस्थांच्या मागणीवरून आम्ही हे बॉयलर तयार करतो. एका अर्थाने हे इको-फ्रेंडली बॉयलर आहेत.

Web Title: Cheap Production Of Coal Using Carbonization Technology

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :AhmednagarTechnologyCoal
go to top