नगरच्या आरोग्य सेवकाबद्दल मुख्यमंत्र्याकडून गौरोद्‌गार

अशोक मुरुमकर
Sunday, 11 October 2020

कोरोना काळात सेवा दिल्यामुळे नगरमधील आरोग्य सेवक सुदाम जाधव यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गौरोद्‌गार काढले आहेत.

अहमदनगर : कोरोना काळात सेवा दिल्यामुळे नगरमधील आरोग्य सेवक सुदाम जाधव यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गौरोद्‌गार काढले आहेत. महाविकास आघाडी सरकारने सुरु केलेल्या ‘माझे कुटुंब माझे जबाबदारी’ अंगर्तग सरकार सर्व कुटुंबाची तपासणी करत आहे. त्यातच नगर जिल्ह्यात एका कुटुंबात एका व्यक्तीची ऑक्सीजन लेवल कमी झाली होती. आरोग्य कर्मचारी  जाधव यांच्या ते लक्षात आले आणि वेळीच उपचार केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी फेसबुकच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांनी आरोग्य कर्मचारी जाधव यांच्या कामाचे कौतुक केले. मार्चपासून राज्यात कोरोना व्हायरसने हातपाय पसरायला सुरुवात केली. सध्या ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याला रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’!.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, नगरीकांमध्ये कोरोनाबाबत सध्या भिती आहे. कोरोना झाला तर मला कोठे नेहून टाकतील ही भिती काहींच्या मनात आहे. पण ही भिती मनात न घेता नागरिकांनी उपाचार घ्यावेत. वेळेत आलेली वयस्कर लोक सुद्धा कोरोनामुळे बरी होऊन जातात. त्यामुळे वेळेत येणे हे महत्त्वाचे आहे. जिद्द जर सर्वांच्या मनात असेल तरच आपण कोरोना हद्दपार करु.

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’मध्ये सध्या घरोघरी जाऊन तपासणी सुरु आहे. यासाठी आरोग्य कर्मचारी, आशा वर्कस, महसुल यंत्रणा, पोलिस यांचे आभार मानत ठाकरे म्हणाले, नगरमधील आरोग्य सेवक सुदाम जाधव यांना तपासणी करत असताना एका व्यक्तीची ऑक्सीजन लेवल कमी वाटली. त्यावर त्यांना आरोग्य केंद्रात नेऊन तपासणी केली असता ते कोराना पॉझिटीव्ह निघाले. आणि वेळेत उपचार घेऊन ते बरेही झाले. वेळीच उपचार झाला नसतात तर?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister Uddhav Thackeray while interacting with the citizens appreciated Sudam Jadhav