वैदू पंचायतचे महाराष्ट्रातील मुख्य पंचाचे निधन

शांताराम काळे 
Monday, 31 August 2020

अकोले तालुक्यातील शाहूनगर येथील अकोले ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तथा वैदू पंचायत महाराष्ट्रातील मुख्य पंच म्हणून त्यांची देशात ओळख असलेले मारुती दुर्गा शिंदे (वय ८१) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

अकोले (अहमदनगर) : जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील शाहूनगर येथील अकोले ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तथा वैदू पंचायत महाराष्ट्रातील मुख्य पंच म्हणून त्यांची देशात ओळख असलेले मारुती दुर्गा शिंदे (वय ८१) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 

अकोले ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संचालक सुरेश शिंदे यांचे वडील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तिन भाऊ, दोन बहिणी, पाच मुली, पाच मुले, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार होता. त्यांच्यावर अकोले येथील प्रवरातीरी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक शामलिंग शिंदे यांनी श्रद्धांजली वाहताना जुन्या पिढीतील जाणते. 

नेतृत्व व समाजाला एकरूप व वादविवाद मिटवण्यात व या समाजाला पुढे नेण्यातमध्ये राज्यातील प्रमुख मंडळींपैकी मारुती शिंदे यांचे कार्य मोठे होते. हा भटका समाज असून या भटक्या समाजाला आजपर्यंत जुन्या लोकांनी सहकारी केली त्यापैकी मारुती दुर्गा शिंदे यांचे कार्य देखील तेवढेच महत्त्वाचे होते. त्यांनी समाजासाठी आपले योगदान दिले. त्यांचा वारसा त्यांचे कुटुंबीय नेहमी पुढे नेतील. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रातील व हिंदू समाजावर मोठी शोककळा पसरली आहे. शिंदे यांचे कार्य एका समाजापुरते मर्यादित नव्हते.

ते सर्व समाजात आपल्या कार्याने परिचित होते. वैद्यकीय त्यांनी जे कार्य केले. ते कार्यभावी पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरेल. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली. असल्याचे श्रद्धांजली सभेत शिंदे यांनी बोलताना व्यक्त केले. तर विश्र्वास आरोटे यांनी वाघ माणुस अशी ओळख तर बाप माणुस देशात आपली ओळख दाखवुन देत समाजासाठी प्राण देणारा माणुस होता. आपला समाज हा मटका असला तरी इनामदार असल्यायाचे ते नेहमी सांगत.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Panchayat of Vaidu Panchayat in Maharashtra passes away