Ahilyanagar News : 'चास गावात डबक्यात बुडून बालकाचा मृत्यू'; साचलेल्या पाण्याच्या डबक्यात पाय घसरला अन्..
चुलते जयसिंग बिडे यांनी त्यास पाण्याच्या बाहेर काढून बेशुद्धावस्थेत उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. कोल्हे यांनी त्यास तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले.
Locals gathered near the water pit in Chas village where the child tragically drowned after slipping.Sakal
नगर तालुका : तालुक्यातील चास परिसरात २७ मे रोजी अतिवृष्टीमुळे घराशेजारी साचलेल्या पाण्याच्या डबक्यात पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून अमितेश बलराज बिडे (वय १०) या बालकाचा मृत्यू झाला. सायंकाळी ५.३० च्या सुमारास ही घटना घडली.