
-नीलेश दिवटे
कर्जत : बालविवाह अथवा बाल अत्याचार प्रतिबंधासाठी कार्यरत असणारी बालसंरक्षण समिती तालुक्यात कागदावरच आहे. या समितीची बैठकच होत नसल्याचे विदारक चित्र असून, मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत कमी असल्याने चोरी-छुपके विवाह सोहळ्याची सध्या रणधुमाळी सुरू आहे. याबाबत नसती अफात नको, म्हणून तक्रार करायला कुणी धजावत नाही. तालुक्यातील सिद्धटेक येथील बालविवाह रोखण्यास यश आले. मात्र या प्रकाराची व्याप्ती तालुका भरात आहे, त्याचे काय?