Accident death : चिंचोली गुरव शिवारात दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू
Talegaon News : दुचाकीचा अपघात झाल्याने पोपट गोडगे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना तातडीने संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तळेगाव : चिंचोली गुरव (ता. संगमनेर) येथील सामाजिक कार्यकर्ते पोपट सीताराम गोडगे (वय ६०) यांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. चिंचोली गुरव शिवारात गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली.