
राहुरी : शहरातील ख्रिस्त बांधवांनी बुधवारी (ता.२) राहुरी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. ख्रिश्चन धर्माच्या व धर्मगुरूंच्या विषयी अपशब्द वापरून बेताल वक्तव्य करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. तहसीलदार नामदेव पाटील व पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आले.