esakal | ख्रिस्ती समाजाने खऱ्या अर्थाने माणुसकी धर्म जोपासला : आमदार डॉ. सुधीर तांबे
sakal

बोलून बातमी शोधा

Christianity has truly embraced the religion of humanity

कोरोना या मानवजातीवरील संकटाच्या काळात ख्रिस्ती समाजाने संगमनेर तालुक्यातील गरजू व दुर्लक्षित जनतेला मदतीचा हात दिला.

ख्रिस्ती समाजाने खऱ्या अर्थाने माणुसकी धर्म जोपासला : आमदार डॉ. सुधीर तांबे

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : कोरोना या मानवजातीवरील संकटाच्या काळात ख्रिस्ती समाजाने संगमनेर तालुक्यातील गरजू व दुर्लक्षित जनतेला मदतीचा हात दिला. येशूच्या शिकवणीप्रमाणे खऱ्या अर्थाने माणूसकीचा धर्म जोपासण्याचे काम ख्रिस्ती बांधवांनी केले असल्याचे गौरोद्गार आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काढले. 

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेच्या वतीने कोरोना संकटात उल्लेखनीय काम करणार्‍या व्यक्तींच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ख्रिस्ती विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल भोसले होते.

ते म्हणाले, कोरोना काळात समाजातील विविध घटकांनी त्यांच्या परीने गरजू, गोरगरीब व परप्रांतियांनाही मदत करुन मानवता धर्माचे पालन केले. संकटकाळामध्ये देश आणि राज्याने एकजुटीने या संकटाचा मुकाबला केला. त्यात ख्रिस्ती समाज बांधवांनी जात, धर्म, पंथ यापलिकडे जावून केलेल्या मदतीतून मानवता धर्माचा आदर्श घालून दिला. नगराध्यक्ष दुर्गा तांबे, प्रा. बाबा खरात यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी सेंटमेरी धर्मग्राम प्रमुख फादर सायमन शिंनगारे, फादर अल्वीन, पा. ग्रेगरी केदारी, पा. शिवाजी लांडगे, जिल्हाध्यक्ष दीपक कदम, तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, प्रभाकर जगताप, सिस्टर सिसीलिया लोपिस, रोजलिन लकरा, लिलावती हिवाळे, अरविंद सांगळे, आर. ई. गायकवाड अदी उपस्थित होते. के. डी. भोसले यांनी आभार मानले.

संपादन : अशोक मुरुमकर