मोक्कार हेलपाटा ः सात्रळ केंद्रात बोलावूनही दिली नाही लस

कोरोना लस
कोरोना लसe sakal

कोल्हार : सात्रळ (ता. राहुरी) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील गलथान कारभारामुळे लसीकरणासाठी आलेल्यांना लस न घेताच माघारी जावे लागले. त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला. उपकेंद्राद्वारे पाठविण्यात आलेल्या चुकीच्या संदेशामुळे हा प्रकार घडला. प्रताप कडू यांनी आरोग्य केंद्राच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, सात्रळचे सरपंच सतीश ताठे यांनी यापुढे लसीकरणाबाबतचा संदेश लोकांपर्यंत देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीमार्फत करू, असे जाहीर केले. लसीकरणासाठी सात्रळ ग्रामपंचायतीने प्राथमिक शाळेची जागा उपलब्ध करून दिली. सात्रळ, सोनगाव, धानोरे पंचक्रोशीतील लाभार्थी लस घेण्यासाठी येथे आले होते. (Citizens have not been vaccinated at Satral Health Center)

कोरोना लस
कोरोनाची लाट ओसरताच पारनेरसाठी आणले पाच कोटी

३१ मार्चपर्यंत ज्यांनी पहिली लस घेतली. त्यांनी लस घेण्यासाठी यावे, असा संदेश आरोग्य केंद्रातर्फे दिला होता. त्यानुसार लाभार्थी आरोग्य केंद्रावर आले. परंतु, त्यांना ४५ वर्षाच्या पुढे ज्यांनी पहिली लस घेतलेली आहे. त्यानंतरच लसीचा डोस शासनाच्या सूचनेनुसार तीन महिन्यांनी किंवा ८४ दिवसानंतर देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. परंतु, लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांचे म्हणणे होते, की आरोग्य विभागाने आधी पहिली लस घेतल्यानंतर दुसरी लस २८ दिवसांनी व नंतरही त्यात पुन्हा बदल करून बेचाळीस दिवसांनी लस मिळेल, असे जाहीर केले. आणि आता मात्र ८४ दिवसांनी लस मिळेल, असेच सांगितले जात आहे.

उपकेंद्राच्या डॉ. परविन तांबोळी म्हणाल्या, मेसेज पाठविण्यात चूक झाली. मात्र, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच लसीकरण होत आहे. ८४ दिवस झाल्याशिवाय लसीकरणाचे पोर्टल स्वीकारीत नाही. दोन लसीकरण झाल्याशिवाय लाभार्थींना अंतिम प्रमाणपत्र नाही. (Citizens have not been vaccinated at Satral Health Center)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com