बदल्यांचा "नगर पॅटर्न'  राज्यात राबविणार ः मुश्रीफ 

 "City pattern" To be implemented in the state: Mushrif
"City pattern" To be implemented in the state: Mushrif

नगर : ग्रामविकास खात्याच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने बदल्यांची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने अंतिम टप्प्यात आणली आहे. बदल्यांचा "नगर पॅटर्न' चांगला आहे. त्यामुळे आगामी वर्षापासून राज्यात ऑनलाइन बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

ग्रामविकास खात्यातर्फे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा अध्यादेश निघाल्यानंतर राज्यभरात बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली असून, नगर जिल्हा परिषदेने ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली आहे.

याबाबत "सकाळ'ने "बदल्यांच्या "नगर पॅटर्न'ची चर्चा' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यावर आज ग्रामविकासमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चर्चा झाली. त्यांनी या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांच्याकडून बदल्यांचा आढावा घेतला. 

जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिलकुमार ओसवाल उपस्थित होते.

नगर जिल्ह्यात ऑनलाइनद्वारे झालेल्या बदल्यांप्रमाणे राज्यभरातील जिल्ह्यांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 


जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या प्रक्रियेवर ग्रामविकासमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. बदल्यांचा "नगर पॅटर्न' राज्यभर राबविणार असल्याचे स्पष्ट केले. 
- राजश्री घुले, अध्यक्ष, जिल्हा परिषद , अहमदनगर

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com