esakal | श्रमदानासाठी आमदार रोहित पवार सरसावले; जामखेडमध्ये तब्बल दोन तास श्रमदान
sakal

बोलून बातमी शोधा

Cleaning in Jamkhed by Rohit Pawar after two hours of hard work

आपलं शहर स्वच्छ व सुंदर असावं, हा मंत्र घेऊन नवीन वर्षाचे स्वागत आमदार रोहित पवारांनी अनोख्या पद्धतीने केले.

श्रमदानासाठी आमदार रोहित पवार सरसावले; जामखेडमध्ये तब्बल दोन तास श्रमदान

sakal_logo
By
वसंत सानप

जामखेड (अहमदनगर) : मतदारसंघाच्या विकासाबरोबरच शहराचा व नागरिकांचा गुदमरलेला श्‍वास मोकळा व्हावा; आपलं शहर स्वच्छ व सुंदर असावं, हा मंत्र घेऊन नवीन वर्षाचे स्वागत आमदार रोहित पवारांनी अनोख्या पद्धतीने केले. "आरोळे हॉस्पिटल'च्या आवारात तब्बल दोन तास श्रमदान करून जामखेडकरांना श्रमदानासाठी प्रेरणा दिली. 

आमदार रोहित पवार गेली वर्षभरापासून दोन्ही तालुक्‍यातील रखडलेल्या योजनाना गती मिळावी; तसेच मतदारसंघाची ओळख राज्यात निर्माण व्हावी याकरिता काम करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे जामखेड व कर्जत हे दोन्ही शहर स्वच्छ व सुंदर व्हावेत, हरवलेले शहरपण पुन्हा प्राप्त व्हावे येथील "गुंडगिरी' ला आळा बसावा. नागरिकांना शिस्त लागावी. कायदा सुव्यवस्था चोख रहावी, शहराला वरदान ठरलेल्या नद्या स्वच्छ व सुंदर होऊन वाहत्या करण्यासाठी काम करीत आहेत.

नवीन वर्षाच्या पार्श्‍वभूमीवर आमदार रोहित पवारांनी कर्जत-जामखेडचा दौरा केला. विविध कार्यक्रमांबरोबरच "श्रमदाना' च्या माध्यमातून आपले योगदान दिले. जामखेडला "कोविड'च्या काळात दोन्ही तालुक्‍यासह आष्टी-पाटोदा,भूम-परांडा, करमाळा या तालुक्‍यातील नागरिकांसाठी "आधारवड' ठरलेल्या ग्रामीण आरोग्य प्रकल्पात श्रमदान केले. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image