राहुरी कृषी विद्यापीठात सामूहिक रजा आंदोलन

Collective leave movement at Rahuri Agricultural University
Collective leave movement at Rahuri Agricultural University

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठात सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात अधिकारी/कर्मचार्यांनी आज अकराव्या दिवशी सामूहिक रजा घेऊन आंदोलन करण्यात आले.

महात्मा फुलेंच्या पुतळ्याजवळ सकाळी कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून सामाजिक अंतर राखत एकत्र जमले. त्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत डॉ. उत्तम कदम, डॉ. सोपान मोरे, डॉ. नंदकुमार कुटे, डॉ. रवि आंधळे, डॉ. विजय पाटील, डॉ. स्वाती शिंदे, मच्छिंद्र बाचकर, एकनाथ बांगर, पी.टी. कुसळकर यांनी मागण्यांसंदर्भात आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्रशासकीय इमारतीसमोर एकत्र येत आपल्या मागण्यांचे निवेदन कुलसचिव मोहन वाघ आणि अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे यांना देण्यात आले. 

या वेळी समन्वय संघाचे उपाध्यक्ष डॉ. उत्तम कदम म्हणाले की आजपर्यंत केलेल्या आंदोलनात सर्वांनी जशी साथ दिली तशीच यापुढील बेमुदत काम बंद आंदोलनाला सर्वांनी साथ द्यावी.

जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आपले आंदोलन सुरुच राहिल. काम बंद आंदोलनात शेतकर्यांची अडचण होऊ नये म्हणुन विद्यापीठाने बियाणे विक्री सुरु ठेवली आहे. सोमवारी आंदोलन चौथ्या टप्प्यात  जाणार असून आंदोलन अधिक तिव्र करण्यासंदर्भात यावेळी सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.

कार्याध्यक्ष डॉ. महावीरसिंग चौहान म्हणतात, सर्व अकृषी विद्यापीठाना सातवा वेतन आयोग व आश्वाशीत प्रगती योजना गेल्या वर्षीच लागू झालेला असून कृषी विद्यापीठाना का वगळण्यात आले? कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्यांवर झालेला अन्याय दिवाळीपूर्वी दूर करण्यात यावा व  कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करावी.

आत्तापर्यंत दिलेल्या निवेदनांचा मंत्रालयात पाठपुरावा  सुरु असून लवकरच यावर सकारात्मक निर्णय होईल. सध्या शेतकर्यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला रब्बी हंगाम सुरु होत आहे. तसेच दिवाळीसारखा महत्वाचा सण जवळ आलेला आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता आपण सर्वांनी आपले आंदोलन मागे घेण्याचा विचार करावा. 

- मोहन वाघ, कुलसचिव.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com