खबरदारी घेऊन महाविद्यालयांचे वर्ग सुरू करणे गरजेचे

सचिन सावंत
Wednesday, 9 December 2020

ग्रामीण भागातील पालकांची व विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती, तसेच नेटवर्कच्या अडचणीमुळे हुशार अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू शकतात.

शेवगाव (अहमदनगर) : ऑनलाइन शिक्षण हे वर्गातील शिक्षणाला पर्याय होऊ शकत नाही. ग्रामीण भागातील पालकांची व विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती, तसेच नेटवर्कच्या अडचणीमुळे हुशार अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन वर्ग सुरू करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संजय फडके यांनी केले.

जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या येथील न्यू आर्टस महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मोफत मास्कवाटप कार्यक्रमात फडके बोलत होते. प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे, उपप्राचार्य डॉ. विजय बानदार, जगदीश आरेकर, प्रा. संजीवनी नवल, प्रा. किशोर मरकड आदी उपस्थित होते. 

प्राचार्य कुंदे म्हणाले, सरकारच्या निर्णयानुसार अनेक महाविद्यालये सुरू झाली आहेत. विद्यार्थ्यांनी व पालकांनी योग्य ती खबरदारी घेत प्रशासनास सहकार्य करावे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वच्छता राखावी, तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. उपप्राचार्य डॉ. विजयकुमार बानदार यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. मीनाक्षी चक्रे यांनी आभार मानले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: College classes need to be started with caution

टॉपिकस