समुदाय आरोग्य अधिकारी गेल्या सात वर्षांपासून आरोग्य उपकेंद्रावर सेवा देतात. त्यात बीएएमएस व बीएस्सी नर्सिंग पदवी असलेले समुदाय आरोग्य अधिकारी आहेत. समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांमुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला गेल्या काही दिवसांपासून बळकटी आली आहे.
Community health officers preparing for black flag protest at Choundi amid unpaid salaries and government apathy.Sakal
अहिल्यानगर : ग्रामीण भागात उपकेंद्रावर व गावोगाव फिरून आरोग्य सेवा देणाऱ्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांवर गेल्या दोन महिन्यांपासून उपासमारीची वेळ आली आहे. मानधन नसल्याने अनेक जण आर्थिक अडचणीत सापडले आहेत.