esakal | अतिवृष्टीची भरपाईची रक्कम आलीय, बघा लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का?

बोलून बातमी शोधा

Compensation for excess rainfall for Nagar district}

दुसऱ्या टप्प्यात प्राप्त झालेले अनुदान हे जिल्ह्यातील दक्षिण भागातील तालुक्‍यांसाठी आहे.

अतिवृष्टीची भरपाईची रक्कम आलीय, बघा लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का?
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर : जिल्ह्यात 2020 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईपोटी राज्य शासनाकडून 5 हजार 48 शेतकऱ्यांसाठी 4 कोटी 27 लाख 84 हजार रुपयांचे अनुदान जिल्हा प्रशासनाला गुरुवारी (ता.25) प्राप्त झाले, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिली. 

जिल्ह्यामध्ये 2020 मध्ये सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला. जिल्ह्यातील सर्व नद्यांच्या पुराचे पाणी नदीपात्राबाहेर आले होते. त्यामुळे नदीच्या काठावरील पिके पाण्यात बुडाली होती. 33 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले.

एक लाख 46 हजार 315 हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. एका शेतकऱ्यास जास्तीत-जास्त दोन हेक्‍टरपर्यंत प्रती हेक्‍टरी 6 हजार 800 रुपये हेक्‍टर प्रमाणे नुकसान भरपाई देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. सिंचन क्षेत्रातील 5 हजार 728 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले. या क्षेत्रासाठी एका शेतकऱ्यास जास्तीत-जास्त 2 हेक्‍टरसाठी प्रति हेक्‍टरी 13 हजार 500 रुपये या प्रमाणे भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

दुसऱ्या टप्प्यात प्राप्त झालेले अनुदान हे जिल्ह्यातील दक्षिण भागातील तालुक्‍यांसाठी आहे. पाथर्डी तालुक्‍यातील 95 गावातील 3 हजार 497 गावातील शेतकऱ्यांसाठी 3 कोटी 48 लाख 44 हजारांचे अनुदान प्राप्त झाले आहे. शेवगाव तालुक्‍यातील 15 गावातील 873 शेतकऱ्यांसाठी 33 लाख 97 हजार रुपये, कर्जत तालुक्‍यातील 10 गावातील 287 शेतकऱ्यांसाठी 18 लाख 41 हजार तर जामखेड तालुक्‍यातील 19 गावांमधील 391 शेतकऱ्यांसाठी 27 लाख 2 हजारांचे अनुदान प्राप्त झाले आहे.

हे अनुदान लवकरच संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग केले जाणार आहे. जिल्ह्यातील 139 गावांमधील 5 हजार 48 शेतकऱ्यांना 4 कोटी 27 लाख 84 रुपयांचे अनुदान नुकसान भरपाईपोटी दिले जाणार आहे. अहमदनगर