पैशावरुन एकाचा खून; मृतदेहाची निळवंडे कालव्याच्या पाण्यात लावली विल्हेवाट

अनंद गायकवाड
Wednesday, 12 August 2020

संगमनेर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नीमज गावाच्या शिवारात निळवंडे कालव्याच्या बोगद्याजवळ पाण्यात आढळलेल्या अंदाजे 35 वर्षच्या अनोळखी पुरुषाच्या मृतदेहाचे कोडे उलगडले आहे.

संगमनेर (अहमदनगर) : संगमनेर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नीमज गावाच्या शिवारात निळवंडे कालव्याच्या बोगद्याजवळ पाण्यात आढळलेल्या अंदाजे 35 वर्षच्या अनोळखी पुरुषाच्या मृतदेहाचे कोडे उलगडले आहे. रामदास कारभारी येरमल ( मुळ रा, शिंदोडी, ता. संगमनेर, हल्ली रा. गोडसेवाडी, ता. संगमनेर) असे त्याचे नाव आहे.

या बाबत मयताची पत्नी अनिता रामदास येरमल (वय 28, रा. गोडसेवाडी) यांनी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यात म्हटले आहे, गोडसेवाडी येथील गोकुळ भास्कर शिरतार, भाऊसाहेब राणू शिरतार व रमेश खंडू म्हस्कूले यांनी उसनवार पैशाच्या कारणावरुन मयत रामदास याच्याशी झालेल्या वादातून गोडसेवाडी येथील छपरात गळफास देवून व काहीतरी घातपात करुन त्याचा खून केला. तसेच त्याच्या मृतदेहाची निमज गावाच्या शिवारातील निळवंडे कालव्याच्या पाण्यात विल्हेवाट लावली.

या फिर्यादीनुसार रामदास येरमल याचा खून केल्याच्या संशयावरुन वरील आरोपींविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पोलिस निरिक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक पी. वाय कादरी पुढील तपास करीत आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complaint of murder of Ramdas Karbhari Yemal in Sangamner taluka for money