वीज थकबाकीदारांसाठी महावितरणची योजना, असा मिळेल लाभ

Concession scheme has been introduced for recovery of electricity arrears
Concession scheme has been introduced for recovery of electricity arrears

राहुरी : "पोलीस बंदोबस्तात शेतकऱ्यांची वीजबिले वसुली करू. वीज तोडू. शेतकऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करु, असे कुठेही बोललो नाही. परंतु, तसे माझ्या तोंडी घालून 'ध' चा 'मा' केला जात आहे. सोशल मीडियाद्वारे भाजपाने मला बदनाम करण्याचे हेतुपुरस्सर षडयंत्र चालविले आहे. शेतकऱ्यांनी भाजपाच्या अपप्रचाराला बळी पडू नये. वीजबिल सवलत योजनेचा लाभ घ्यावा." तनपुरे म्हणाले, शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी ऊर्जा राज्यमंत्री म्हणून काम करीत आहे. राज्यसरकार शेतकऱ्यांवर पोलीस कारवाईची वेळ कधीही आणणार नाही. तालुक्यात मागील दहा वर्षात ऊर्जाविषयक पायाभूत कामे झाली नाहीत. त्यामुळे सर्व रोहित्रे ओव्हरलोड झाले. आता, नवीन शंभर रोहित्रे दिले.  तीन वीज उपकेंद्र मंजूर केले. त्याची निविदा प्रक्रिया सुरु होईल. येत्या दोन-तीन वर्षात तालुक्यात एकही रोहित्र ओव्हरलोड राहणार नाही.  त्यामुळे, भाजपाच्या लोकांचे पोटशूळ उठले आहे.

नवीन ऊर्जा धोरणात कृषी पंपाच्या थकित वीज बिलावर ६० ते ७० टक्के सवलत योजना सुरू केली आहे.  महावितरणच्या अधिकाऱ्यांनी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना योजना समजून सांगावी. पूर्वकल्पना न देता वीजपुरवठा खंडित करू नये. अशा सूचना दिल्या आहेत, असे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

तेलीखुंट (नगर) येथे महावितरणच्या कार्यालयाच्या दारात गुंड प्रवृत्तीचा व्यक्तीने रात्रीच्या वेळी लघुशंका केली. त्याला हटकणार्‍या कर्मचाऱ्याला मारहाण केली. चाकूचा धाक दाखवून दहशत केली. घटनास्थळी जाऊन, महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मानसिक आधार दिला.

त्यावेळी, "अशा घटना खपवून घेणार नाही. अशा समाज कंटकांविरुद्ध पोलीस कारवाई करू. प्रसंगी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देऊ." असे बोललो. त्याचा संदर्भ शेतकऱ्यांच्या वीजबिल वसुलीशी लावून शेतकऱ्यांची माथी भडकविण्याचा भाजपाने केविलवाणा प्रकार चालविला आहे.

वीजबिलाची ६६ टक्के रक्कम जिल्ह्यातील उर्जा विषयक पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी वापरली जाईल. शेतकऱ्यांना बिलात सवलत व उच्च दाबाने, सुरळीत वीजपुरवठा असा दुहेरी फायदा होईल. त्यामुळे, शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा." असे आवाहन मंत्री तनपुरे यांनी केले. अहमदनगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com