श्रीरामपुरात शेतकरी, कामगार कायद्याविरोधात काँग्रेसची मोहीम

Congress campaign against labor law in Shrirampur taluka
Congress campaign against labor law in Shrirampur taluka

श्रीरामपूर (अहमदनगर) : प्रदेश काँग्रेसच्या वतीने महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजपा सरकारच्या शेतकरी, कामगार विरोधी कायद्याविरोधात काँग्रेसच्या सह्यांच्या मोहीमेचा नुकताच येथे प्रारंभ झाला. 

येथील सुयोग मंगल कार्यालयात काँग्रेसचे जिल्हा शहराध्यक्ष किरण काळे, आमदार लहू कानडे, युवक काँग्रेसचे महासचिव करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, उपाध्यक्ष इंद्रनाथ थोरात, जिल्हा युवकचे कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे, निखील पापडेजा यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी आमदार कानडे म्हणाले, केंद्र शासनाने नुकतेच मंजूर केलेले शेतकरी,कामगार विरोधी कायद्यामुळे शेतकरी भांडवल दाराच्या दावणीला बांधला जाणार आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या कायद्यातून अन्न-धान्य वगळल्याने गोरगरीब भूमीहीनांना भांडवलदार ठरवतील. त्यादराने अन्न-धान्य विकत घेण्याची वेळ येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

काळे म्हणाले, जिल्हात युवक काँग्रेस व एनएसयुआयचे संघटन मजबूत करणार असून युवकांना आगामी निवडणुकांमध्ये महत्वाची भूमिका पाडायची आहे. युवकांनी पुढाकार घेऊन केंद्र सरकार विरोधी सह्यांची मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
उपनगराध्यक्ष ससाणे म्हणाले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली व आमदार कानडे यांच्या सहकार्याने श्रीरामपूर मतदारसंघात शेतकरी,कामगार विरोधी कायद्यास अधिकाधिक विरोध करुन जनतेच्या भावना केंद्र सरकारपर्यंत पोहचविणार असल्याचे त्यांनी सांगितले. गुजर म्हणाले, काँग्रेसच्या युवकांनी स्व. जयंत ससाणे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीत महत्वाची भूमिका पार पाडली आहे. 

शेतकरी व कामगार विरोधी कायद्याचे युवकांमार्फत जनजागृती करुन मोहीम यशस्वी करतील. प्रारंभी सिद्धार्थ फंड यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर उपाध्यक्ष थोरात यांनी आभार मानले. याप्रसंगी राष्ट्रवादी विध्यार्थीचे माजी तालुकाध्यक्ष आकाश क्षिरसागर यांचा आमदार कानडे, उपनगराध्यक्ष ससाणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. यावेळी नाशिक युवक काँग्रेसचे स्वप्नील पाटील, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष कार्लस साठे, सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, बाबासाहेब कोळसे, पंचायत समिती सदस्य विजय शिंदे, राजेंद्र पाउलबुद्धे, संग्राम कानडे, रितेश रोटे, मुरली राऊत, भास्कर लिपटे उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com