esakal | ज्यांचे २०१४ ला काँग्रेसबद्दलचे भाकित खरं ठरलं, त्यांनीच बिहारच्या निकालबद्दलही सांगितलंय... 
sakal

बोलून बातमी शोधा

The Congress leader claims that Tejaswi Yadav will be the Chief Minister of Bihar

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत महराष्ट्राबद्दल ज्यांनी अंदाज व्यक्त केला अन्‌ तो खरा ठरला. म्हणून त्याची दखल पक्षाने योग्य दखल घेतली.

ज्यांचे २०१४ ला काँग्रेसबद्दलचे भाकित खरं ठरलं, त्यांनीच बिहारच्या निकालबद्दलही सांगितलंय... 

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

अहमदनगर : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत महराष्ट्राबद्दल ज्यांनी अंदाज व्यक्त केला अन्‌ तो खरा ठरला. म्हणून त्याची दखल पक्षाने योग्य दखल घेतली. ती व्यक्ती म्हणजे आमदार ॲड. रामहरी रुपनवर! त्यांनी आता बिहारच्या विधानसभा निवडणुकीबद्दलही अंदाज व्यक्त केला आहे. बिहारमधील निवडणुकीत आमदार रुपनवर यांनी दौराही केला आहे.

बिहारमध्ये भाजप आणि जेडीयुचे नेते मुख्यमंत्री नितेश कुमार व काँग्रेस आणि आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांच्यात सामना रंगला आहे. येथे दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व राहुल गांधी यांच्या येथे सभा झाल्या. आरोप- प्रत्यारोपाने ही निवडणूक गाजली. पहिल्या टप्प्यातील मतदान झाल्यापासूनच येथे राज्यकीय विश्‍लेषकांसह अनेकजण वेगवेगळे अंदाज बांधत आहेत. असाच अंदाज महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते राज्यपाल नियुक्त आमदार ॲड. रामहरी रुपनवर यांनी व्यक्त केला.  

बिहारमधील निवडणुकीबाबत ‘सकाळ’शी बोलताना ते म्हणाले, बिहारमध्ये तेजस्वी यादव यांच्याबद्दल युवकांमध्ये ॲट्रॅक्शन आहे. येथे तेजस्वी यादव हे मुख्यमंत्री होतील असं चित्र आहे. नितीशकुमार हे १५ वर्षापासून सत्तेत असल्याने त्यांच्याकडे वजेची बाजू आहे. तेजस्वी यादव यांच्याबद्दल युवकांमध्ये ॲट्रॅक्शन असले तरी येथे जोरात चुरस होईल. पण तेजस्वी यादव हे मुख्यमंत्री होतील. तेजस्वी यादव यांच्यासह पाच पक्षाची येथे आघाडी आहे. येथील सभा व वातावरण पाहिले तर काँग्रेससह इतर पाच पक्षांनी केलेली आघाडीचे यशस्वी होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला आहे.