esakal | काँग्रेसची स्वबळाची तयारी; अकोले नगरपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बैठक्‍
sakal

बोलून बातमी शोधा

Congress meeting on the backdrop of Akole Nagar Panchayat elections

अकोले शहर काँग्रेस पक्षीय कार्यकर्त्यांची बैठक जिल्हाउपाध्यक्ष, सोन्याबापू वाकचौरे गुरुजी यांच्या उपस्थितीत झाली.

काँग्रेसची स्वबळाची तयारी; अकोले नगरपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बैठक्‍

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : अकोले शहर काँग्रेस पक्षीय कार्यकर्त्यांची बैठक जिल्हाउपाध्यक्ष, सोन्याबापू वाकचौरे गुरुजी यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीमध्ये अकोल नगरपंचायतच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये १७ प्रभागातील आरक्षण सोडतीची चर्चा होऊन प्रभाग निहाय उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. 

काँग्रेसच्या वतीने काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब नाईकवाडी यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीच्या सर्व १७ प्रभागात उमेदवार देवन मोठ्या मताधिक्याने निवडून आणन्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे ठरले.

या वेळेस मार्गदर्शन करतांना सोन्याबापू वाकचौरे गुरुजी यांनी काँग्रेसच्या व युवक काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी नगरपंचायतीची उमेदवारी करावी, अशी सुचना केली. त्यास सर्वच कार्यकर्त्यांनी होकार दर्शविला. त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे प्रदोशाध्यक्ष, राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जे कोणी कार्यकर्ते काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करु इच्छित असतील त्या सर्वांचच तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात येईल.

अकोले नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसपक्षाच्या वतीने राज्याचे प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाप्रमाणे अध्यक्षीय उमेदवार निवडला जाईल असे बैठकीत ठरले. अकोले नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे महसुलमंत्री व महा.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मंत्री बाळासाहेब थोरात व डॉ. सुधीर तांबे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना एकजुटीने व जोमाने निवडणुक लढविण्याच्या संदर्भात आदेश दिले आहेत. 

या बैठकीस जिल्हा सेक्रेटरी शिवाजी नेहे, जिल्हा सहसचिव आरिफभाई तांबोळी, अल्प संख्यांक सेलचे ता.अध्यक्ष शब्बीरभाई शेख, मागासवर्गीस सेल चे अध्यक्ष किशोर रूपवते, काँग्रेस सेवा दल शहराध्यक्ष अनिल शेटे विधी सेलचे अध्यक्ष अॅड.रमेश जोरवर, युवक काँग्रेसचे अमोल नाईकवाडी, बाबासाहेब नाईकवाडी, संतोष नाईकवाडी, तालुका विधीसेलचे अध्यक्ष अॅड.बी.एम.नवले, तालुकाउपाध्यक्ष अॅड.के.बी.हांडे, तालुका काँग्रेस व्यापारी सेलचे अध्यक्ष भाऊसाहेब नाईकवाडी (जय सियाराम), सरचिटणीस संपतराव कानवडे, बी.डी.देशमुख, सलीम शेख, गणेश गुरुकुले, सौ.कांचन रुपवते, अरुणा गायकवाड, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.नितिन बिबवे, डॉ.सुधीर कोटकर, संतोष तिकांडे, काँग्रेस सेवादलाचे तालुकाध्यक्ष कैलासराव वाकचौरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. तर शिवसेना सवता सुभा करण्याच्या विचारात असल्याने राष्ट्रवादीच्या भूमिका बाबत लक्ष्य असून आघाडीत बिघा डी पाहायला मिळत आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image
go to top