
नेवासे शहर : मत चोरीचा आरोप करत आज काँग्रेस कमिटी व विविध संघटनांकडून नेवासे तहसील कार्यालयावर मोर्चा काढत भाजप सरकार व निवडणूक आयोगाचा निषेध करण्यात आला. देशात झालेल्या लोकसभा व चार राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांत मोठ्या प्रमाणात मतदान हेराफेरी झाल्याचे आरोप करत याविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बेंगळुरू येथे पुराव्यासह आपले म्हणणे देशातील नागरिकांसमोर सादर केले. यावेळी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आरोप केले.