
पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांना मोठा त्रास होतो.
संगमनेर (अहमदनगर) : पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांना मोठा त्रास होतो. रस्त्यावरील खड्डे 10 दिवसांत न बुजविल्यास टोल बंद आंदोलन करण्याचा इशारा युवक कॉंग्रेस व संगमनेर तालुका एनएसयूआय यांच्यातर्फे देण्यात आले.
"आयएलएफएस' टोलवसुली करणाऱ्या कंपनीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की अतिवृष्टीमुळे नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हे घाट ते बोटा खिंड परिसरात असंख्य खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली. वाहनचालकांना त्यावरील खड्डे चुकविताना तारेवरची कसरत करावी लागते. लहान-मोठ्या अपघात वाढले. महामार्गालगतच्या बाभळींचा दुचाकीस्वारांना त्रास होतो. स्थानिकांसाठी बोटा, अकोले नाका, साकूर फाटा, माझे घर हाउसिंग सोसायटी, घुलेवाडी येथे सर्व्हिस रोड तयार करावेत, पथदिवे दुरुस्त करावेत, तसेच टोल नाक्यावर स्थानिक भूमिपूत्रांना कामावर घ्यावे, कर्मचाऱ्यांची पगारवाढ करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
या वेळी युवक कॉंग्रेसचे सोमेश्वर दिवटे, अजय फटांगरे, सुभाष सांगळे, निखिल पापडेजा, एनएसयूआयचे अध्यक्ष गौरव डोंगरे, सचिन खेमनर, नगरसेवक नितीन अभंग, शैलेश कलंत्री, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष आनंद वर्पे, हैदरअली सय्यद आदी उपस्थित होते.
संपादन : अशोक मुरुमकर