महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस वाढवीणार

गौरव साळुंके
Wednesday, 23 September 2020

महसुलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात काँग्रेस पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याची, ग्वाही काँग्रेसचे नवनियुक्त कार्याध्यक्ष सचिन गुजर यांनी दिली.

श्रीरामपूर (अहमदनगर) : महसुलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात काँग्रेस पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याची, ग्वाही काँग्रेसचे नवनियुक्त कार्याध्यक्ष सचिन गुजर यांनी दिली. 

नगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी गुजर यांची निवड झाल्याबद्दल प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव करण ससाणे यांनी आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात गुजर बोलत होते.

महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, युवानेते करण ससाणे यांच्यामुळेच जिल्हा काँग्रेसमधील जबाबदारीचे पद मिळाले. आपले प्रेरणास्थान आमदार जयंत ससाणे यांनी शेवटपर्यंत काँग्रेस पक्षाची साथ सोडली नाही. त्यांच्या विचारातून त्यांना अभिप्रेत असलेल्या काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे गुजर यांनी सांगितले. 

नगर जिल्हा काँग्रेसमध्ये तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्याबद्दल करण ससाणे यांच्या हस्ते सर्व नुतन पादाधिकाऱ्यांचा सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले. तसेच येथील माउली प्रतिष्ठानचे संस्थापक ज्ञानेश्वर भानुदास मुरकुटे यांची जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी निवड झाली आहे. महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे तसेच आमदार लहू कानडे यांच्या सुचनेनुसार जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली असून त्यात मुरकुटे यांची निवड केली आहे. मुरकुटे यांनी यापूर्वी अशोक मिल्क, रोटरी क्लबचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. संघटनात्मक कामाचा अनुभव असल्याने मुरकुटे यांची नियुक्ती झाल्याचे आमदार कानडे यांनी सांगितले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress will expand under the guidance of Revenue Minister Balasaheb Thorat