काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना पक्षवाढीसाठी ताकद देणार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 December 2020

कॉंग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना पक्षवाढीसाठी ताकद देणार असल्याचे प्रतिपादन कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले.

अहमदनगर : कॉंग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना पक्षवाढीसाठी ताकद देणार असल्याचे प्रतिपादन कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले. 

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित महिला कॉंग्रेसच्या बैठकीत ते बोलत होते. नलिनी गायकवाड, महिला कॉंग्रेसच्या राज्य सचिव उषाकिरण चव्हाण, सुनीता बागडे, जहीदा झकारिया, सिंधू कटके, नीता चोरडिया आदी उपस्थित होत्या. 

काळे म्हणाले, की महिला कॉंग्रेसच्या माध्यमातून शहरात महिलांचे संघटन उभे करण्यासाठी महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांना ताकद दिली जाईल. शहरातील महिलांचे विविध प्रश्न हाती घेऊन ते सोडविण्यासाठी महिला कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. युवक कॉंग्रेसचे विशाल कळमकर, प्रवीण गिते, प्रमोद आबूज, अमित भांड, सौरभ रणदिवे, विशाल केकाण आदी उपस्थित होते. दरम्यान, महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत, एकमेकींना जिलेबी भरवून आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीचा आनंद साजरा केला.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress will give strength to women office bearers for party growth