संघटना बांधणीसाठी काँग्रेसची युवा ब्रिगेड उतरली मैदानात

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष तथा युवक, एनएसयुआय जिल्हा समन्वयक किरण काळे त्याचबरोबर युवक कॉंग्रेसचे जिल्हा निरीक्षक अकील पटेल, जिल्हा कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष निखिल पापडेजा हे शुक्रवारपासून जिल्हा दौरा करत प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी बैठका घेणार आहेत. 

नगर : युवक कॉंग्रेस, एनएसयुआयच्या संघटनात्मक बांधणीसाठी कॉंग्रेस पक्षाने आता जिल्ह्यातील आपल्या युवा नेत्यांना मैदानात उतरत जिल्हा दौरे सुरू केले आहेत. 

कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष तथा युवक, एनएसयुआय जिल्हा समन्वयक किरण काळे त्याचबरोबर युवक कॉंग्रेसचे जिल्हा निरीक्षक अकील पटेल, जिल्हा कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष निखिल पापडेजा हे शुक्रवारपासून जिल्हा दौरा करत प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी बैठका घेणार आहेत. 

या दौऱ्यानंतर तालुकास्तरावरील नियुक्‍त्या अंतिम केल्या जाणार असून वरिष्ठ नेत्यांच्या मान्यतेनंतर त्यांची घोषणा केली जाणार आहे. या दौऱ्यात 16 ऑक्‍टोबर -अकोले, कोपरगाव, शिर्डी, राहता, 17 ऑक्‍टोबर - राहुरी, श्रीरामपूर, नगर तालुका, नगर शहर, 18 ऑक्‍टोबर - नेवासे, शेवगाव, पाथर्डी, कर्जत, जामखेड, 19 ऑक्‍टोबर - श्रीगोंदे, पारनेर, संगमनेर येथे होईल.

जिल्ह्यातील अकोले, कर्जत, पारनेर नगरपंचायतीच्या निवडणुकांचे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे. नुकत्याच कॉंग्रेसच्या नगरपालिका निहाय निरीक्षक व तालुका प्रभारी यांच्या नियुक्‍त्या जाहीर केल्या होत्या. 

संपादन - अशोक निंबाळकर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress youth brigade took to the field to form an organization