जामखेड पंचायत समितीच्या बांधकामास आणि इतर उपकामास मंजुरी

Construction of Jamkhed Panchayat Samiti and other works have been approved due to follow up of MLA Rohit Pawar
Construction of Jamkhed Panchayat Samiti and other works have been approved due to follow up of MLA Rohit Pawar
Updated on

जामखेड (अहमदनगर) : जामखेड पंचायत समितीच्या तळमजला इमारतीवर पहिल्या मजला बांधकामास व इतर उपकामास मंजुरी मिळाली आहे. या कामासाठी 3 कोटी 88 लाख 90 हजारांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली. 

जामखेड येथील पंचायत समितीचे तळमजल्याचे बांधकाम करण्यात आलेले आहे. पंचायत समितीतील वेगवेगळ्या विभागांची कामे सध्या याच तळमजल्याच्या इमारतीत पार पडतात. मात्र पंचायत समितीच्या कामाचा आणि विविध विभागाचा आवाका पाहता सध्या कार्यान्वित असलेली जागा अपुरी पडत होती. त्यामुळे आमदार रोहित पवारांनी पुढाकार घेऊन ही इमारत प्रशस्त आणि सुसज्ज करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या नियोजित पहिल्या मजल्याचे बांधकाम मूळ तळमजल्याच्या इमारतीवर करण्यात येणार आहे. 

आमदार पवार म्हणाले, जामखेड येथील पंचायत समितीच्या तळमजल्यात महिला पदाधिकाऱ्यांसाठी प्रसाधनगृहासह विश्रांती कक्षाची व्यवस्था करण्यात आली नसल्याने तशी व्यवस्था पहिल्या मजल्यावर करण्यात येणार आहे. या बांधकामात ग्रीन संकल्पना, नैसर्गिक प्रकाशयोजना व वायूवीजन, पाण्याच्या व ऊर्जेच्या वापरात काटकसर, पर्जन्य जलपुनर्भरण आणि जास्तीत जास्त पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य व साधनसामुग्रीचा वापर करण्यात येणार आहे.
 
पंचायत समिती प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या मजल्याचे 698.90 चौ.मी. क्षेत्रफळाचे बांधकाम प्रस्तावित केलेले आहे. प्रशासकीय कार्यालयांच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीने होत असलेला कायापालट नागरिकांच्या अडचणी एकाच छताखाली सोडवण्यासाठी फायद्याचा ठरणार आहे. 

सगळी कामे एकाच छताखाली व्हावीत असा प्रयत्न !
 
'पंचायत समितीची तळमजला इमारत नजीकच्या काळात झाली असली तरी त्यामध्ये अनेक त्रुटीही आहेत. पहिल्या मजल्याच्या नियोजनात आवश्‍यक असणाऱ्या सर्व बाबी पूर्ण करून घेण्यात येतील. कोणतीही व्यक्ती आल्यावर त्या व्यक्तीची कामे एकाच छताखाली व्हावीत, असा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. वेगवेवेळ्या विभागाचे अधिकारी एकाच ठिकाणी असतील तर गटविकास अधिकाऱ्यांची कार्यक्षमता वाढेल. 
- आ. रोहित पवार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com